जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज जिल्ह्यातून १ हजार १६७ बाधित रूग्ण आढळून आले आहे. सर्वांधिक रूग्ण चोपडा तालुक्यात आढळून आले आहेत. त्यानंतर भुसावळ, अमळनेर आणि जळगाव शहरातही रूग्ण संख्या वाढलेली दिसून येत आहे. आजच १३ रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
आजची आकडेवारी
जळगाव शहर-१०१, जळगाव ग्रामीण-१४, भुसावळ-१२६, अमळनेर-१२२, चोपडा-३०७, पाचोरा-२८, भडगाव-६८, धरणगाव-४६, यावल-६६, एरंडोल-२७, जामनेर-७७, रावेर-६५, पारोळा-१९, चाळीसगाव-५९, मुक्ताईनगर-२१, बोदवड-३१ आणि इतर जिल्ह्यातील ३ असे एकुण १ हजार १६७ रूग्ण आढळून आले आहे.
कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात आजपर्यंत ९० हजार १८५ कोरोना रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ७६ हजार ७३४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ११ हजार ८१३ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. जळगाव शहर-४, भुसावळ-१, अमळनेर-२, चोपडा-१, भडगाव-१, धरणगाव-१, यावल-१, एरंडोल-१, आणि पारोळा- १ असे १३ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.