मुंबई– रविवारी राज्यात ११ हजार १११ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर दिवसभरात २८८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्यात आज ८८३७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण ४ लाख १७ हजार १२३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ७० टक्के एवढे आहे. आज ११ हजार १११ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ५८ हजार ३९५ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३१ लाख ६२ हजार ७४० नमुन्यांपैकी ५ लाख ९५ हजार ८६५ नमुने पॉझिटिव्ह (१८.८४ टक्के) आले आहेत. राज्यात १० लाख ५३ हजार ८९७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३८ हजार २०३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २८८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३६ टक्के एवढा आहे.