जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील २१ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. आज दिवसभरात १ हजार १११ जणांना पहिली लस तर 197 जणांना दुसरी लस देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकुण २५ हजार १४९ जणांना कोवीशिल्डची पहिली लस देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात आता कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. आज ३३६ बाधित रूग्ण जिल्ह्यातून आढळून आलेत. जिल्ह्यातील 21 कोवीड लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध करून देण्यात आले आहे. आज बुधवार ३ मार्च रोजी दिवसभरात झालेले लसीकरण याप्रमाणे आहेत. जिल्हा रूग्णालय- १२२, गोल्ड सीटी हॉस्पिटल-०, गाजरे हॉस्पिटल-०, ऑर्किड हॉस्पिटल-०, जैन हॉस्पिटल-०, जामनेर-४२, चोपडा-७०, मुक्ताईनगर-३३, चाळीसगाव-५६, पारोळा-७०, भुसावळ-९२, अमळनेर-९५, पाचोरा-८२, रावेर-४६, यावल-१०६, भडगाव-२९, बोदवड-१४, एरंडोल-४७, भुसावळ रेल्वे हॉस्पिटल-०, धरणगाव-६०, एम.डी. भुसावळ-१२२ असे एकुण १ हजार १११ जणांना कोरोनाची पहिली लस देण्यात आली आहे. तर कोरोनाची दुसरी लस जिल्ह्यात आज १९७ जणांना देण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.