जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | प्रकाश बंडू पाटील हे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक उद्या बुधवार, दि. ३१ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होत आहेत.
सेवानिवृत्त होणाऱ्या सर्व शिक्षकाचा आणि कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्तीच्या दिवशी पीपीओ देऊन गौरवण्यात आले. त्या अनुषंगाने प्रकाश बंडू पाटील यांनी गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना ११ हजार रुपयाची मदत केली.
डॉ. आशिया यांनी सदर शिक्षकाचे मनःपूर्वक कौतुक केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. स्वतःच्या वेतनातून गरजू विद्यार्थ्यांसाठी मदत करणारे श्री. पाटील यांच्या दातृत्वाची जिल्हा परिषदेत आणि परिसरात चर्चा होती.