Home Cities जळगाव किनोद येथे ग्रामस्थांनी पकडले अवैध वाळू वाहतूक करणारे ११ ट्रॅक्टर

किनोद येथे ग्रामस्थांनी पकडले अवैध वाळू वाहतूक करणारे ११ ट्रॅक्टर


ef1c2687 9507 4268 ac36 aa26e9de876d

जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील किनोद येथील ग्रामस्थांनी आज (दि.६) सकाळी ८.३० च्या सुमारास गावातील नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारे ११ ट्रॅक्टर पकडले आहेत. गावातील लोकांनी एकत्र येवून ही कारवाई केली आहे.

 

गेल्या काही दिवसांपासून येथे नदीपात्रातून सर्रास अवैध वाळू वाहतूक सुरु होती. प्रशासनाचे मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसून येत होते. अखेर गावातील लोकांनीच पुढाकार घेवून ही कारवाई केली असून पकडलेले ११ ट्रॅक्टर तहसील प्रशासनाच्या ताब्यात दिले आहेत. येथील तहसील कार्यालयाने पंचनामा करून पकडलेली वाळू व वाहने जप्त केली आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound