चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा शहरापासून जवळ असलेल्या विष्णापूर येथील एका पत्रीशेडच्या घरावर शनिवारी २७ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास छापा टाकून ११ लाख ५०० रुपये किंमतीचा गांजा अडावद पोलीस स्टेशनने जप्त केला आहे. दुचाकीसह एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विष्णापूर येथील सायसिंग बरकत बारेला (वय ३६) हा गावातील शिवाजी पाडा परिसरातील एका पत्रीशेडमध्ये अवैध गांजा बाळगत असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने शनिवारी दि. २७ रोजी पहाटेच्या सुमारास चोपड्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे, पो.नि. कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली अडावदचे स.पो.नि. संतोष चव्हाण, पो.उ.नि. राजु थोरात, पो.हे.कॉ. भरत नाईक, ज्ञानेश्वर सपकाळे, संजय धनगर, सतिष भोई, भूषण चव्हाण, जयसिंग राजपूत, मधुकर पवार यांच्या पथकाने छापा टाकला. यावेळी ११ लाख ५०० रुपये किंमतीचा गांजा जप्त केला. तसेच ६ हजार रुपये किंमतीचा ईलेक्ट्राँनिक वजन काटा, एक लाख रुपये किंमतीची मोटार सायकल यासह सायसिंग बारेला यास अटक केली आहे. पुढील तपास पो.हे.काँ. अनवर तडवी करीत आहे.