जळगाव प्रतिनिधी । कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात १ हजार ५९ रूग्ण आढळून आले आहे. तर १ हजार ७४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जळगाव शहरासह भुसावळ आणि चोपडा तालुक्यात संसर्ग कायम आहे. आज दिवसभरात २२ रूग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
जिल्हाभरात आजची आकडेवारी
जळगाव शहर-१९०, जळगाव ग्रामीण-१२, भुसावळ-१६१, अमळनेर-२२, चोपडा-१३२, पाचोरा-६६, भडगाव-५२, धरणगाव-४२, यावल-६५, एरंडोल-६७, जामनेर-६८, रावेर-३९, पारोळा-३७, चाळभ्सगाव-३६, मुक्ताईनगर-८, बोदवड-४९ आणि इतर जिल्ह्यातील १३ असे एकुण १ हजार ५९ बाधित रूग्ण आढळून आले आहे.
जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात एकुण १ लाख ९ हजार २७७ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ९६ हजार १५३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ११ हजार १९३ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरात २२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.