मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी| यंदाच्या उन्हाळ्यामुळे अंगाची लाही-लाही होत असून महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान सध्या विदर्भ व खान्देशात पाहायला मिळत आहे. जळगाव जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट सुरू असून तापमानाचा पारा 47 अंश सेल्सियसवर जाऊन पोहोचला आहे. या वाढत्या तापमानाचा फटका केवळ माणसांना, शेतातील पिकांनाच बसतो असे नाही. तर, मुक्या जीवांना देखील कडक उन्हाळ्याचा त्रास होत आहे. या वाढत्या उष्णतेमुळे जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताई नगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा गावात मेंढपाळ कुटुंबीयांच्या 100 हून अधिक मेंढ्यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची माहिती मीळाली आहे. या खळबळजनक घटनेमूळे प्रशासन अलर्ट झालेले आहे. उन्हामुळे नागरिकही घराबाहेर पडत नसल्याचे दिसून येत आहे.

आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली भेट
कुऱ्हाकाकोडा गावातील मेंढ्या दगावल्याच्या घटनेनंतर आ. चंद्रकांत पाटील यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली काकोडा येथील रहिवाशी मेंढपाळ नामदेव चोपडे, भरत मदने, भोजू मदने, ज्ञानेश्वर मदने यांचे सर्वांचे मिळून जवळपास 90 ते 100 मेंढ्या उष्माघाता मुळे थेरोळा शिवारात मृत्यूमुखी पडलेले आहेत यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी तहसीलदार, पशू अधिकारी यांची 8 – 9 जणांची टीम, मंडळ अधिकारी, तलाठी यांना सोबत घेऊन भेट दिली.
या घटनेची माहिती आमदार पाटील यांनी व्हिडिओ कॉल वरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री डॉ राधाकृष्ण विखेपाटील, नामदार गिरीशभाऊ महाजन,जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना फोन द्वारे दिलेली आहे.
यावेळी आ . चंद्रकांत पाटील यांच्या सोबत अशोकभाऊ कांडेलकर, तालुका प्रमुख नवनीत पाटिल, विभाग प्रमुख विनोद पाटिल, पंकज पांडव, रणजित सेठ गोयनका, सतिष नागरे, विनोद चौधरी, दिपक वाघ सर, दिलीप भोलानकर, अविनाश वाढे, पंकज धाबे, राहुल खिरळकर पांडुरंग तांबे, योगेश मूलक, गणेश सोनवणे, विष्णु पाटिल, शेख फारुख, जावेद खान परिसरातील शेतकरी नागरिक उपस्थित होते. यावेळी पंचनामा व इतर महत्वाच्या सूचना आमदार महोदयांनी संबधीत अधिका-यांना दिल्यात.