मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आगामी दिवाळीच्या पार्श्वभूमिवर मंत्रीमंडळाने शिधापत्रीकेवर १०० रूपयात चार जीवनावश्यक वस्तू देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
राज्य मंत्रीमंडळाची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात शिंदे सरकारनं एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, अवघ्या १०० रुपयांत एक किलो रवा, चनाडाळ, साखर आणि तेल दिवाळीच्या सणासाठी मिळणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा राज्यातील सात कोटी जनतेला लाभ होणार असल्याचे सांगण्यात आले.
सध्या जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडलेल्या असल्याने सर्वसामान्यांना दिवाळीसारखा सण कसा साजरा करावा याचा प्रश्न पडलेला आहे. या पार्श्वभूमिवर मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे.