पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील खडकदेवळा येथील प्रसिद्ध असलेल्या हिवरा मध्यम प्रकल्पातील जलसाठा हा फक्त १० टक्केच शिल्लक असून उपयुक्त जलसाठ्याबाबत शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर चिंतातूर झाले आहे.
या प्रकल्पावर परिसरातील १५ तर १० गावांच्या पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींना मंजुरी देण्यात आली आहे. अशा अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन याच हिवरा मध्यम प्रकल्पावर अवलंबून आहेत. तसेच या प्रकल्पामुळे परिसरातील बागायतदार शेतकरी मोठ्या संख्येने अवलंबून असतात. हे प्रकल्प दरवर्षी १०० टक्के भरुन ओसांडून वाहत असतो. मात्र यावर्षीच्या पाऊसाने परिसरात हुलकावणी दिली असल्याने यामुळे प्रकल्पात जलसाठ्यात वाढच झाली नाही. सध्या हिवरा मध्यम प्रकल्पात १० टक्के इतका जलसाठा शिल्लक आहे. हिवरा मध्यम प्रकल्पाच्या उगमस्थानी डोंगराळ भागातील परिसरात दमदार पाऊसच झाला नसल्याने प्रकल्पात कुठल्याही जलपातळी मध्ये वाढ झाली नाही त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थ चिंतातूर आहे.
खडकदेवळा ता. पाचोरा येथील हिवरा मध्यम प्रकल्प हा हिवरा नदीवर बांधण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या उगमस्थानी डोंगराळ भागात चांगला पाऊस झाल्यास या प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ होत असते. याच हिवरा माध्यम प्रकल्पाच्या उगमस्थानी पासून आता दोन ते तीन छोटे मोठे धरण बांधण्यात आल्याने हे धरण जेव्हा ओसांडून वाहतील तेव्हाच या प्रकल्पातील पाण्याची पातळी मध्ये वाढ होत असते मात्र प्रकल्पांच्या उगमस्थानीच दमदार पाऊस झालाच नसल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. येणाऱ्या काळात प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात मुसळधार पाऊसाची अपेक्षा शेतकरी व ग्रामस्थ व्यक्त केली आहे.