पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । येथील क्वॉरंटाईन सेंटरमध्ये रॅपीड अँटिजेन प्रकारात करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये १० रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून यात पहूरच्या दोघांचा समावेश आहे.
पहूर येथील ग्रामीण रुग्णालय अंतर्गत आर. टी. लेले हायस्कूलमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये आज दि. १८ रोजी घेण्यात आलेल्या ४७ रॅपिड अॅन्टीजेन टेस्टपैकी १० जणांचे अहवाल पॉझीटीव्ह तर ३७ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. यात पहूर येथील बाधित जिल्हा परिषद शिक्षकाच्या दोन मुलांना संसर्ग झाला असून पहूरला बाधितांची एकूण संख्या ६० झाली आहे.नोडल ऑफिसर डॉ . हर्षल चांदा यांच्या मार्गदर्शना खाली सदर चाचण्या घेण्यात आल्या.
आज घेतलेल्या चाण्यांमध्ये खालीलप्रमाणे रूग्ण आढळून आले आहेत.
पाळधी -१; शेंदूर्णी – १; एकूलती – १; बिलवाडी -१ ; – १; जांभोळ – १; वाकोद-४
रॅपिड अँटीजन टेस्ट कामी डॉ. हर्षल चांदा, डॉ. पुष्कराज नारखेडे, डॉ. संदीप कुमावत डॉ. जितेंद्र वानखेडे, डॉ. कुणाल बाविस्कर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ सुनील चौधरी, देवेंद्र घोंगडे, प्रदीप नाईक, संजय सरपटे यांच्यासह आशा सेविका तसेच वैद्यकीय यंत्रणेसह पोलीस प्रशासन व ग्रामपंचायत प्रशासनाचे सहकार्य लाभत आहे.