अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील निंभोरा येथे राहणाऱ्या एका शेतकऱ्याची ऑनलाइन पद्धतीने ९९ हजार ९९९ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शरद गुलाबराव पाटील वय-४१ रा. कलाली ता. अमळनेर जिल्हा जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून शेती करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. 30 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता ते अमळनेर तालुक्यातील निंभोरा येथील बँकेत असताना त्यांना अज्ञात खातेदाराने त्यांच्या खात्यातून ९९ हजार ९९९ हजार रुपयांची रक्कम विनापरवानगी ऑनलाईन पद्धतीने काढून फसवणूक केल्याचे समोर आले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शेतकरी शरद पाटील यांनी मारवड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार मंगळवारी ३० जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता मारवाड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विकास देवरे हे करीत आहे.