अमळनेर येथे कारमधून १ लाखांची रोकड लांबविली; पोलीसात गुन्हा

अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील मारवड येथे राहणाऱ्या २९ वर्षीय तरुणाच्या कारमधून १ लाख २ हजार ५०० रुपये रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की योगेश आधार पाटील (वय-२९) रा. विठ्ठल मंदिर जवळ मारवाड ता. अमळनेर हे कामाच्या निमित्ताने २३ सप्टेंबर रोजी दुपारी २.३० वाजता अमळनेर शहरात (एमएच १९ बी ९९८९) या कारने अमळनेर येथे आले होते. कामाच्या निमित्ताने शहरातील राज सारथी तलाठी कार्यालयाच्या गेटजवळ कार पार्किंग लावून गेले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी कार मध्ये ठेवलेले  १ लाख २ हजार ५०० रुपयांची रोकड चोरून नेल्याचे उघडकीला आले. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल शरीफ पठाण करीत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!