Home क्राईम फळ विक्रेत्याचे बंद घर फोडून १ लाख ७२ हजारांचा ऐवज लंपास

फळ विक्रेत्याचे बंद घर फोडून १ लाख ७२ हजारांचा ऐवज लंपास


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील पाटीलवाडा परिसरात राहणाऱ्या एका फळ विक्रेत्याच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी १ लाख ७२ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोकड लंपास केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी (१० फेब्रुवारी) दुपारी २.३० वाजता उघडकीस आली असून, रात्री ११.३० वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इब्राहिम इलियास बागवान (वय ३०, रा. मुंजोबा मंदिराजवळ, पाटील वाडा, भुसावळ) हा आपल्या कुटुंबासह वास्तव्याला असून, फळ विक्री करून उदरनिर्वाह करतो. सोमवारी दुपारी २.३० वाजता त्याचे घर बंद असताना अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडले. घरातील लोखंडी कपाटातून सोन्या-चांदीचे दागिने आणि २८ हजार रुपयांची रोकड असा एकूण १ लाख ७२ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.ही घटना समोर आल्यानंतर इब्राहिम बागवान यांनी तातडीने भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव करत आहेत.


Protected Content

Play sound