कांदिवलीत कारमधून १ कोटीची रोकड जप्त ; ९ जण ताब्यात

kandivali

मुंबई प्रतिनिधी । कांदिवलीत नाकाबंदी दरम्यान एका कारमधून १ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. यात चालकासह आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, विधानसभा निवडणूक २०१९ च्या पार्श्वभूमीवर इतक्या मोठया प्रमाणात पैसे सापडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर पोलिसांनी संशयास्पद वाहनांची तपासणी सुरू केली आहे. त्याच अनुषंगाने कांदिवली पूर्वेला पश्चिम द्रुतगती महामार्गावर शुक्रवारी रात्री समतानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री नाकाबंदीचे काम करत होते. त्यावेळी साडे अकराच्या सुमारास एक कार ग्रोव्हेल्स मॉलजवळील सर्व्हिस रोडवर टाटा हेक्सा जात असतांना त्यात बसलेल्या सेठचे वागणे संशयास्पद वाटल्याने ती कार थांबवत त्याची झडती घेण्यात आली. त्यावेळी तब्बल एक कोटींची रोकड आढळून आल्याने पोलिसांनी अमित सेठ यांच्यासह नऊ जणांना अटक केली आहे. याबाबत अधिक तपास पोलिस करत आहेत.

Protected Content