अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या हिवाळी क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन ओमशांती अमळनेर सेंटर प्रमुख विद्यादिदी व अध्यक्षा ॲड ललिता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संस्थेचे सचिव प्रा श्याम पाटील संचालक पराग पाटील प्राचार्य विकास चौधरी उपस्थित होते.
सुरुवातीला सरस्वती पूजन व मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मशाल प्रज्वलित करण्यात आली तसेच बास्केटबॉल ग्राउंड वर श्रीफळ फोडत क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विद्यादिदी यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा महोत्सवचे महत्व पटवून देत अध्यात्मिक ज्ञानाचे उत्तम असे महत्त्व सांगितले व आपल्या जीवनात खेळ व अध्यात्म यांची सांगड बसवत आपण किती यशस्वी होऊ शकतो, हे पटवून दिले ॲड. ललिता पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या प्राचार्य विकास चौधरी यांनी क्रीडा महोत्सवाचा आढावा यावेळी आपल्या मनोगतातून मांडला.
तीन दिवसीय आयोजित या क्रीडा महोत्सवात ग्रीन ब्ल्यू रेड सेफरोन हाऊस यांच्यातील विद्यार्थ्यांमध्ये विविध स्पर्धा होणार आहेत यात प्रामुख्याने बास्केटबॉल बॅडमिंटन बुद्धिबळ रिले रेस स्कीपींग रोप शॉट पुट खो-खो क्रिकेट स्केटिंग गोळा फेक यासारख्या इतर ३० खेळांचे खेळांच्या स्पर्धा होणार आहेत विद्यार्थी प्रचंड उत्साहाने प्रत्येक खेळात सहभाग नोंदवीत आपल्या संघाला विजयी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. सूत्रसंचालन विलास पाटील सर यांनी केले व आभार क्रीडा शिक्षक केदार सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व कर्मचारीवृंद यांनी परिश्रम घेतले