भुसावळ : प्रतिनिधी । पाच वर्षांपूर्वी गोळी झाडून एकाची हत्या केल्यानंतर फरार झालेल्या अमित परिहार या आरोपीला आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेकायदा गावठी कट्ट्यासह अटक केली
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील स.फौ.अशोक महाजन, पो.हे.काँ. शरीफ काझी, पो.ना. युनूस शेख, किशोर राठोड, पो.काँ. विनोद पाटील, रणजीत जाधव, दिपक चौधरी, हरीष परदेशी, उमेश गोसावी यांनी ही कारवाई केली .
अमित नारायणसिंह परिहार यांच्याविरोधात भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं 461 /2020 आर्म अँक्ट 3/25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
.त्याच्यावर अगोदर भुसावळ बाजार पेठ पोलिस स्टेशनला पाच वर्ष अगोदर 302 नुसार गुन्हा दाखल होता. त्याने नटवर चावरिया यांना धुळे सब जेल येथून पोलिस कैदी पार्टी बस मध्य भुसावळ येथे कोर्टात हजर करणे साठी येत असताना तो बस मध्य बसून आला व बस नाहटा चौफुली वर थांबली असता त्याने बस मधून उतरताना त्याच्या छातीत गोळी मारून खून केला व मोटार सायकल वर पळून गेला होता .