Home क्राईम ५ लाखांसाठी विवाहितेचा छळ ; सासरच्या ८ जणांविरुद्ध ...

५ लाखांसाठी विवाहितेचा छळ ; सासरच्या ८ जणांविरुद्ध गुन्हा

0
37

 

 पाचोरा, प्रतिनिधी ! नविन व्यवसाय सुरू करण्यासाठी माहेरहुन ५ लाख रुपये आणावे म्हणून  विवाहीतेचा शारिरीक व मानसिक छळ होत होता  वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून पिडीतीने सासरच्या ८ जणांविरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल केला

 

पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली हे कॉ अजय मालचे  करीत आहे.  कविता सोनवणे हिचा ६ वर्षांपासून सासरच्या मंडळींकडून शारिरीक व मानसिक छळ होत होता. माहेरहुन व्यवसायासाठी ५ लाख रुपये आणावे अशी मागणीही वारंवार होत असल्याने होणाऱ्या त्रासाला कंटाळून कविता हिने पाचोरा पोलिसात महेश सोनवणे (पती), पंढरीनाथ सोनवणे (सासरा), मथुराबाई सोनवणे (सासु), सुनिल सोनवणे (जेठ), अनिता सोनवणे (जेठाणी), निर्मलाबाई सुर्यवंशी (ननंद), जिभाऊ सुर्यवंशी (नंदोई), बंटी सुर्यवंशी (भाचा) ( सर्व रा. राजीव गांधी काॅलनी, पाचोरा ) अशा ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


Protected Content

Play sound