जामनेर, प्रतिनिधी | दिवाळीतील भाऊबीज हा बहीण भावामधील प्रेमाच्या नात्याची ओळख करून देणारा सण आहे. त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खाद्यतेल गॅस सिलेंडर व घरगुती सामानाचे पन्नास टक्के दर कमी करून देशातील बहिणींना भाऊबीजेची ओवाळणी द्यावी अशी मागणी आमदार गिरीश महाजन यांना निवेदनाद्वारे देण्यात आले.
हे निवेदन त्यांच्या निवासस्थानी आमदार महाजन उपस्थित नसल्यामुळे नगराध्यक्षा साधना महाजन यांनी स्वीकारले. निवेदन राष्ट्रवादी महिला जिल्हा अध्यक्ष वंदना चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली देण्यात आले. भाऊबीजेला बहीण ओवाळल्यानंतर आशीर्वाद देते आणि बहिणीच्या प्रेमाखातर भाऊ आपल्या बहिणीला ओवाळणी देत असतो. २०१४ मध्ये महागाई, बेरोजगारी या मुद्द्यावर जेव्हा मतदानरुपी आशीर्वाद मागायला आमच्या दारात आला होता तेव्हा समस्त महिला भगिनिनी आपल्याला मतरुपी आशीर्वाद देऊन निवडून दिले होते. पण आज महागाईने “न भूतो न भविष्य” असा उच्चांक गाठला आहे हे तुम्हाला दिसत असेल की नाही याबतीत शंकाच आहे. परंतु, आम्हा संसार करणाऱ्या बायकांना हे सर्व दिसतं आज खाद्यतेल, गॅस सिलेंडर, डाळी यांच्या किमती सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या आशीर्वादामुळे आमच्यावर संक्रांत आली आहे. त्यामुळे तुम्हाला दिलेल्या मतरुपी आशीर्वादाची ओवाळणी मागायला आम्ही आज एक बहीण म्हणून आलो आहे असे आमदार गिरीश महाजन यांच्याशी भ्रमणध्वनीवरून बोलताना राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्षा वंदना चौधरी यांनी यांना सांगितले. तसेच वाढत्या महागाईत डाळी, पेट्रोल, गॅस, तेल यांचे भाव कमी करून दिवाळीनमित्त भाऊबीज म्हणून बहिणींना पन्नास टक्के दर कमी करण्यात यावे याबाबतचे लेखी निवेदन देण्यात आले. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी यांचे दिवाळीची मिठाई देऊन साधना महाजन यांनी तोंड गोड केले. यावेळी प्रल्हाद बोरसे, किशोर अप्पा पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू नाईक, दत्ताभाऊ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. यावेळी आमदार महाजन हे मतदार संघात बाहेर असल्यामुळे राष्ट्रवादीच्या जिल्हा अधक्ष वंदना चौधरी यांनी यांनी दूरध्वनीवरून आमदार महाजन यांची संपर्क साधून आपल्या मागण्या मोदी साहेबांपर्यंत पोहोचवण्याची विनंती केली. यावेळी निवेदन देताना राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, तालुका अध्यक्षा रत्ना पाटील, अशोक चौधरी, राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर पाटील, प्रल्हाद बोरसे, दत्ता साबळे, राजेश नाईक, अझहर शेख, शाहिद शेख, अहमद खान,प्रभू झाल्टे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.