गाजीपूर: ( उत्तर प्रदेश ) : वृत्तसंस्था । गाजीपूर जिल्ह्यात तियरा गावात तीन पाय असलेले मूल जन्माला आले आहे. दैवी चमत्कार असल्याचा लोकांचा समज झाला आहे. लोक या मुलापुढे अनेक गोष्टी अर्पण करीत आहेत. दूरदूरहून लोक मुलाला पाहण्यासाठी येत आहेत.
तियरा गावातल्या प्रियंका देवी २९ सप्टेंबरला बद्दोपूरच्या पीएचसी येथे प्रसूत झाल्या. प्रसूती सामान्य झाल्यामुळे कुटुंबात आनंद झाला. प्रसूतीनंतर सुईण बाहेर आल्यानंतर तिने मुलाला तीन पाय असल्याचे सांगितले. मुलाचा तिसरा पाय त्याच्या गुप्तांगाशी जोडला गेलेला आहे. या पायाला सहा बोटे आहेत. हे ऐकून सर्वांना धक्काच बसला. हे नवजात बालक सामान्यपणे दूध पीत होते.
या मुलाचा जन्म म्हणजे दैवी अवतार किंवा चमत्कार असल्याचे मानून लोक मुलाला पाहण्यासाठी गर्दी करू लागले आहेत मुलाचे वडील विवेकानंद गरीब आहेत. उपचार करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. मुलाच्या उपचारासाठी लोकांनी आपल्याला मदत करावी, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना देखील मदतीचे आवाहन केले आहे.
हा विशिष्ट प्रकारचा आजार असून त्याला कंजेनिटल अनोमिली म्हणतात. तपासणीनंतरच त्याच्यावर उपचार होतील गरोदर महिला रेडिएशनच्या संपर्कात आली किंवा एखाद्या औषधाचा साइड इफेक्ट झाल्यास अशा प्रकारचे मूल जन्माला येते. असे डॉक्टर म्हणाले.