हाथरस : २ अहवाल , पाहिल्यात नाही , दुसऱ्यात बलात्काराची नोंद !

हाथरस ( उत्तर प्रदेश) : वृत्तसंस्था । हाथरस घटनेतील पीडितेवरील बलात्काराच्या मुद्यावर अधिकाऱ्यांची आणि कुटुंबांची परस्पर विरोधी विधानं समोर येत असताना मेडिकल रिपोर्टमुळे गोंधळ आणखीन वाढलाय. दोन्ही वैद्यकीय अहवालही वेगवेगळे आहेत पाहिल्यात बलात्काराचा उल्लेख नाही आणि दुसऱ्यात आहे

रुग्णालयात उपचार सुरू असताना हाथरस पीडित तरुणीनं दिलेल्या व्हिडिओ जबाबानुसार, तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. त्यानंतर आठ दिवसांनी अलीगढच्या रुग्णालयाकडून पीडितेच्या मेडिको-लीगल निरीक्षणात खासगी अंगात ‘कम्प्लिट पेनिट्रेशन’, गळा दाबण आणि तोंड बांधण्याचा उल्लेख करण्यात आला होता. याच अलीगढ मुस्लीम विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजकडून दिलेल्या अंतिम निरक्षणात, ‘फॉरेन्सिक’ विश्लेषणाचा हवाला देताना ‘संभोगा’ची शक्यता फेटाळून लावली होती.

जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजच्या फॉरेन्सिक मेडिसिन डिपार्टमेंटकडून तयार करण्यात आलेल्या मेडिको लीगल केसमध्ये पीडिता हल्ल्याच्या वेळीच बेशुद्ध पडल्याचं सांगितलं होतं. जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजचे फॉरेन्सिक मेडिसिन डिपार्टमेंटमध्ये सहाय्यक प्रोफेसर डॉ. फैज अहमद यांनी तयार केलेल्या रिपोर्टमध्ये, पीडितेच्या शरीरावर किंवा कपड्यांत किंबा कपड्यांवर वीर्याचे नमुने आढळले का? या प्रश्नाचं उत्तर लिहिताना ‘माहीत नाही’ असा उल्लेख केलाय.

पीडितेवर हल्ला १४ सप्टेंबर रोजी झाला होता. निरीक्षण अहवाल २२ सप्टेंबर दुपारी पूर्ण झाला होता. निरीक्षण करणाऱ्या डॉक्टर भूमिका यांच्या म्हणण्यानुसार, पीडितेवर बळजबरी करण्यात आली होती. परंतु, फॉरेन्सिक सायन्स लॅबकडूनच निश्चित माहिती दिली जाऊ शकते, असंही त्यांनी म्हटलं होतं.

२२ सप्टेंबर रोजी मेडिको लीगल केस रिपोर्टनं, फॉरेन्सिक चौकशीत बलात्काराचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत, या उत्तर प्रदेश पोलिसांच्या दाव्यांचं खंडण केलं. उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदे आणि व्यवस्था) प्रशांत कुमार यांनी पीडितेच्या सॅम्पल्सवर वीर्य सापडलं नसल्याचं सांगितलं होतं.

पीडितेचा गळा दुपट्ट्यानं दाबण्यात आला. पहिल्यांदाच पीडितेचं तोंड बंद करण्यात आलं, त्यानंतर तिची हत्या करण्यासाठी तिच्यावर हल्ला करण्यात आला. संबंधित आकृत्यांमध्ये गळा दाबल्यानं पीडितेच्या गळ्यावर उजवीकडे १०x३ सेमी आणि डावीकडे ५x२ सेमीचे निशाण आढळले. परंतु, खासगी अंग दर्शवणाऱ्या आकृत्यात जखमांचा कोणताही उल्लेख नव्हता.

१० ऑक्टोबर रोजी हाथरस जिल्ह्याच्या सादाबाद पोलीस स्टेशनकडून देण्यात आलेल्या पत्रात जेएनएमसीनं नमुन्यांची पूर्ण फॉरेन्सिंक चौकशीचा हवाला दिला. त्यावरून, पीडेतेवर लैंगिक अत्याचार झाला नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. इंटरकोर्स’चे कोणतेही संकेत मिळाले नसल्याचा उल्लेख यात करण्यात आलाय.

डॉ. अहमद यांच्याकडून स्वाक्षरी करण्यात आलेल्या अहवालात पीडितेच्या गळ्यावर आणि पाठीवर जखमांचे निशाण आहेत. जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजनंही शारीरिक हल्ल्यांचा उल्लेख केला होता. पीडितेनं दिलेल्या व्हिडिओ जबाबानंतर चार जणांना आरोपी बनवण्यात आलेलं आहे.

Protected Content