मुंबई वृत्तसंस्था । प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना खंडणीसाठी धमकी आली आहे. अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमच्या नावाने ही धमकी देण्यात आली असून मांजरेकरांकडून ३५ कोटींची मागणी करण्यात आली आहे.
महेश मांजरेकर यांना व्हॉट्सअॅपवरून दोन दिवसांपासून धमकीचे मेसेज येत होते. त्यांना ३५ कोटी रुपये खंडणी देण्याची मागणी केली जात होती. अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम याच्या नावाने ही धमकी दिली जात असल्याने मांजरेकर यांनी खंडणीविरोधी पथकाकडे जाऊन तक्रार नोंदवली.
पथकाला मेसेज दाखवून धमकी येत असलेल्या मोबाइलचा नंबरही देण्यात आला. त्यानंतर पथकाने कार्यवाही करत रत्नागिरीतून एकाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणाचा अबू सालेमशी काही संबंध आहे का?, धमकी देण्यामागचं नेमकं कारण काय? याचा तपास करण्यात येत आहे.