जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाकडून आज प्राप्त झालेल्या अहवालातून जिल्ह्यात पहिल्यांदा ८७८ रूग्णांनी कोरोनावर मात केली असून आज जिल्ह्यात २६१ रूग्ण कोरोना बाधित आढळून आले आहे. आजच्या अहवालात चाळीसगाव तालुक्यात संसर्ग वाढल्याचे दिसून आले आहे. आजच्या अहवालात पहिल्यांदा आढळून आलेल्या रूग्णांपेक्षा बरे होणारे रूग्ण तीन पटीने असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
आजची आकडेवारी
जिल्ह्यातील तालुक्यांचा विचार केला असता, जळगाव शहर-२८, जळगाव ग्रामीण-४, भुसावळ-२६; अमळनेर-३२; चोपडा-१६; पाचोरा-९; भडगाव-७; धरणगाव-१९; यावल-४; एरंडोल-३; जामनेर-२१; रावेर-२९; पारोळा-७; चाळीसगाव-३९; मुक्ताईनगर-११; बोदवड-४ आणि इतर जिल्ह्यांमधील २ असे एकुण २६१ रूग्ण आढळून आले आहेत.
दरम्यान, आज ८७८ रूग्ण बरे झाले असून आजवर बरे होणार्यांची संख्या ३९ हजार ६३१ इतकी झाली आहे. तर आज ९ मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा ११७५ वर पोहचला आहे. सध्या जिल्ह्यात ७ हजार १०१ रूग्णांवर उपचार सुरू आहे.
jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today, livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news, amalner corona, amalner corona news, amalner corona updates, amalner, amalner news, amalner latest news, corona alamner, chalisgaoncoronanews, chalisgaoncoronaupdates, bhusawalcorona, bhusawalcoronaupdates, bhusawalcoronanews