रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील ‘गाते’ येथील २१ वर्षीय विवाहीतेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज बुधवार, दि. ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली आहे. यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.
गाते येथील २१ वर्षीय विवाहीता सपना बाविस्कर (वय २१) यांचा चार महिन्यापूर्वी हर्षल बाविस्कर याच्या सोबत विवाह झाला होता. सासु-सासरे कामानिमित्त बाहेर गेल्यावर तसेच पती देखिल बाहेर गेल्यावर मयत सपना हीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतची माहिती पोलिसांना कळवण्यात आली असून घटना स्थळी पोलीस पोहचले आहे.