१२ वर्षांखालील मुलांवर कोरोना लसीची चाचणी सुरु

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ।  फायझर कंपनीने गुरुवारपासून १२ वर्षापेक्षा कमी वर्षाच्या मुलांवर कोरोना लसीची चाचणी सुरु केल्याची माहिती दिली आहे.

 

जागतिक लसीकरण मोहिमेमधील पुढच्या टप्प्याची ही सुरुवात असल्याचं मानलं जात आहे.  फायझरने सहकारी कंपनी बायोएनटेकच्या मदतीने या चाचण्या सुरु केल्या आहे. “आमची सहकारी कंपनी बायोएनटेकच्या मदतीने फायझर-बायोएनटेक कोव्हिड १९ लसीची सुरक्षा, सहनशीलता आणि रोगप्रतिकारशक्तीसंदर्भातील चाचणी करण्यासाठी जागतिक मोहिमेअंतर्गत अभ्यासादरम्यान निरोगी बालकांना लस दिली आहे,” असं कंपनीने म्हटलं आहे.

 

कंपनी लहान मुलांना देण्यात येणाऱ्या तीन वेगवेगळ्या प्रकारच्या लसींची निर्मिती करण्याच्या विचारात असून त्यासंदर्भातच चाचण्या सुरु  आहे.

 

कंपनीने याआधीच १२ ते १५ वयोगटातील मुलांसाठी  लसीची चाचणी सुरु केलीय. अमेरिकेमध्ये आपत्कालीन प्राधिकरणाने १६ वर्षे आणि त्यावरील व्यक्तींना लसीकरणाची परवानगी दिली आहे. फायझर, मॉडर्ना, एस्ट्राजेनेकाने लहान मुलांवरील लसींच्या चाचण्या करण्यास सुरुवात केलीय. जॉन्सन अॅण्ड जॉन्सन सध्या लहान मुलांना देण्यात येणाऱ्या लसीवर संशोधन करत आहे.

 

लहान मुलांना  संसर्गाची शक्यता वयस्कर व्यक्तींपेक्षा कमी असली तरी संसर्ग होण्याचा धोका नाकारता येत नाही. लहान मुलांना  संसर्गाचा अधिक त्रास होतो  त्यामुळेच लहान मुलांसाठीही लस निर्माण करण्याचा सल्ला अनेक आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे. फायझरचे प्रवक्ते शेरॉन कॅस्टिलो यांनी २०२१ च्या दुसऱ्या सहामाहीमध्ये मुलांवरील लसीच्या चाचण्यांसंदर्भातील निकाल समोर येतील. असे सांगितले

Protected Content