नवी दिल्ली : वृत्तसंस्था । बिहार विधानसभा निवडणूक निकाल प्रक्रियेत १२८ जागांवर NDA ने आघाडी घेतल्याचं चित्र आहे. भाजपाला ७३ जागांवर आघाडी मिळाली आहे जदयूला ४९ जागांवर आणि HAM ला १ जागेवर आघाडी मिळाली आहे.
महाआघाडीने १०५ जागांवर आघाडी घेतली आहे. यापैकी ६७ जागांवर राजद, २० जागांवर काँग्रेस आणि डाव्यांनी १८ जागांवर आघाडी घेतली आहे. बसपाला दोन जागांवर, एमआयएमला दोन जागांवर तर एलजेपी आणि इतर यांना चार जागांवर आघाडी मिळाली आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत तरी एनडीएला आघाडी मिळते आहे निवडणूक आयोगाने ही माहिती दिली आहे.
बिहार निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. अनेक एग्झिट पोल्सनीही बिहारमध्ये सत्तापालट होईल असेच अंदाज वर्तवले होते. आतापर्यंत एनडीएला २० पेक्षा जास्त जागांवर विजय मिळाला आहे.