१०१ संरक्षण उत्पादनांची आयात रोखली ; संरक्षण मंत्र्यांचा मोठा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) संरक्षण मंत्रालयाने भारतात येणाऱ्या १०१ वस्तूंवर आयातबंदी करण्याचा निर्णय घेतला. राजनाथ सिंह यांनी आपल्या ट्विटरवर याबाबत घोषणा केली.

 

राजनाथ सिंह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले, संरक्षण विभाग आत्मनिर्भर भारताला चालना देण्यासाठी मोठा निर्णय घेत आहे. यानुसार संरक्षण विभाग यापुढील काळात 101 वस्तूंच्या आयातीवर बंदी घालत आहे. या वस्तूंची भारतातच निर्मिती केली जाईल. आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय आहे, असेही राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ नावाने स्वावलंबी भारतासाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा, यंत्रणा, लोकसंख्याशास्त्र आणि मागणी या ५ खांबांवर आधारित ही योजना आहे. त्यासाठी संरक्षण विभाग यापुढील काळात १०१ वस्तूंच्या आयातीवर बंदी घालत आहे. या वस्तूंची भारतातच निर्मिती केली जाईल. यामुळे आत्मनिर्भर भारतासाठी नक्कीच मदत होईल,असे राजनाथ सिंह म्हणाले. राजनाथ सिंह काही तरी महत्त्वाची घोषणा करणार आहेत हे आधीच स्पष्ट करण्यात आले होते. भारताच्या संरक्षण खात्याला मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी संधी मिळेल असे जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केले त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Protected Content