१०० कोटी हा आकडा नव्हे तर देशाच्या सामर्थ्याचे प्रतिबिंब : पंतप्रधान

नवी दिल्ली वृत्तसंस्था | भारतानं १०० कोटी डोसचं कठीण लक्ष पार केलं. हा फक्त आकडा नसून देशाच्या सामर्थ्यांचं प्रतिबिंब असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते देशवासीयांना संबोधित करत होते.

 

भारताने काल १०० कोटी लसीकरणाचा महत्वाचा टप्पा पार केला. यानंतर पंतप्रधानांनी आज सकाळी देशाला संबोधीत केले. मोदी म्हणाले की, जेव्हा १०० वर्षांमधील मोठी महासाथ आली तेव्हा भारतावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. भारत लसी कुठून आणणार, पैसे कसे उभारणा, महासाथीला आळा घालण्यासाठी भारत प्रयत्न करू शकेल का असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. हे १०० कोटी लसींचे डोस त्याचं उदाहरण देत आहे. आज भारतानं १०० कोटी डोस मोफत दिले आहे. आज जग भारताला कोरोनापासून भारताला सर्वात सुरक्षित मानेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. आज जग भारताची ताकद पाहत आहे असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.

मोदी पुढे म्हणाले की, भारतानं इतिहास रचला आहे. आपण भारतीय विज्ञान, उद्योग आणि १३० कोटी भारतीयांच्या सामूहिक भावनेच्या विजयाचे साक्षीदार बनत आहोत. आपले डॉक्टर्स, नर्स आणि त्या सर्वांना धन्यवाद ज्यांनी हे ध्येय गाठण्यास मदत केली, असं म्हणत पंतप्रधानांनी सर्वांचे आभार मानले आहेत. आपण वेगानं लसीकरण करण्यासाठी एक यंत्रणा उभारली. कोविन ऍपचं आज जगभरातून कौतुक होत आहे. १०० कोटॉ डोस पूर्ण करणं ही सोपी गोष्ट नव्हती. परंतु भारतानं ते शक्य करून दाखवलं. भारतानं त्यासाठी एक यंत्रणा उभारली. लसीकरण मोहिमेदरम्यान भारतानं विज्ञानाची साथन सोडली नाही. लसीकरणामुळे अर्थव्यवस्थेन नवा उत्साह आला, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Protected Content