जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या रूममधून ४५ हजार रुपये किमतीचा लॅपटॉप अज्ञात चोरट्याने चोरून नेला. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात सोमवारी ३ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जयेश भिकू मालसुरे (वय-१९) रा. नवी मुंबई ह.मु. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील मुलांचे होस्टेल हे वास्तव्याला आहे. विद्यापीठात तो शिक्षण घेत आहे. दरम्यान ३ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या खोलीतून ४५ हजार रुपये किमतीचा विस्टन कंपनीचा लॅपटॉप आणि चार्जर अज्ञात चोरट्याने चोरून नेला. या संदर्भात जयेश मालसुरे या विद्यार्थ्याने सोमवारी ३ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन महाजन करीत आहे.