जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शिक्षण घेण्यासाठी जिल्हयासह राज्यातून आलेल्या सुमारे साडेचारशे विदयार्थीनी येथील कैसीई सोसायटीच्या मू.जे. महाविद्यालय परिसरातील असलेल्या विदयार्थीनीच्या वसतिगृहात इको फेंडली गणेशोत्सव साजरा करत आहे.
विदयार्थीनीसाठी २१ वर्षापासून हा गणेशोत्सव सुरू केला असून यंदा हे २२ वे वर्ष आहे. स्टेज व डेकोरेशन, मुर्ती खरेदीपासून ढोल ताशे सांगण्यापर्यंतची सर्व कामे मुलींच करत असतात. असे रेक्टर संजीव पाटील यांनी सांगितले. गणेश विसर्जनाच्या दिवशी या साडेचारशे विदयार्थीनी दरवर्षाप्रमाणे डोक्याला खास महाराष्ट्रीयन पध्दतीचा भगवा फेटा बांधुन विसर्जन मिरवणुक काढणार असल्याचे मंडळाची अध्यक्षा अपर्णा चौधरी व सचिव अपूर्वा महाजन यांनी सांगितले. तसेच यावर्षी गणेशाची आरती झाल्यावर लगेच राष्ट्रगीत होणार आहे.
उत्सवाच्या दि. १ सप्टेंबर पासून दहाही दिवस रात्री ८ वाजता विविध स्पर्धा होणार आहेत. यात रोजी निंबु चमचा, Tie the Legs, Ballon Destination, संगीत खुर्ची, Paper Dance, स्नेहसंमेलन जल्लोष 2022 आदी कार्यक्रम संपन्न होणार आहेत. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन हे या विदयार्थीनीनी केलेले आहे. यासाठी अध्यक्षा अपर्णा चौधरी, उपाध्यक्षा रोहीणी पाटील, सचिव अपुर्वा महाजन, खजिनदार धनश्री माळी, रूपाली पाटील, गायत्री परदेशी, निकीता पाटील यांच्यासह सर्व कमिटी चेअरमन, सदस्य व वसतिगृहातील विदयार्थीनी सहकार्य करीत आहेत. असे रेक्टर श्री. संजीव पाटील यांनी सांगितले.