होय…लॉकडाऊन ४.० येणार ! – पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली वृत्तसंस्था । आज आत्मनिर्भर भारत मोहिमेच्या अंतर्गत २० लाख कोटी रूपयांचे पॅकेज जाहीर केल्यानंतर देशात लॉकडाऊन ४.० येणार असल्याचे स्पष्ट करून याबाबत १८ मे आधी माहिती देण्यात येणार असल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली.

पंतप्रधान मोदी हे आज रात्री आठ वाजता देशाला संबोधित करणार असल्याची माहिती जाहीर झाल्यानंतर ते नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या अनुषंगाने आज मोदी म्हणाले की, आत्मनिर्भर भारताची इमारत ही अर्थव्यवस्था, इन्फ्रास्ट्रक्चर, सिस्टीम, लोकसंख्या आणि मागणी या पाच स्तंभांवर उभी आहे. यासाठी २० लाख करोड रूपयांच्या पॅकेजची घोषणा त्यांनी केली. भारताच्या जीडीपीच्या अंदाजे २० टक्क्यांइतके हे पॅकेज आहे. उद्यापासून अर्थमंत्री जनतेला यातील विविध तरतुदींची माहिती देतील असे पंतप्रधान म्हणाले. गत सहा वर्षात देशात झालेल्या आर्थिक सुधारामुळे आज आपत्तीतही भारताची व्यवस्था अधिक सक्षम व समर्थ असल्याचा दावा त्यांनी केला. या पॅकेजमुळे सर्व क्षेत्रांना प्रोत्साहन मिळणार असून यामुळे अर्थव्यवस्थेला गती येणार आहे.
दरम्यान, पंतप्रधान पुढे म्हणाले की, कोरोनाच्या आपत्तीत लोकलनेच आपल्याला वाचवले आहे. स्थानिक बाजारपेठ, उत्पादन आणि सप्लाय चेन आदींची महत्वाची भूमिका आहे. याच्याच माध्यमातून आपण या प्रकोपाचा सामना करणार आहोत. यामुळे आजपासून प्रत्येक भारतवासी लोकलसाठी ग्लोकल बनायचे आहे. स्थानिक प्रॉडक्ट खरेदी करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. कोरोना हा दीर्घ काळापर्यंत आपल्या जीवनाचा भाग बनणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे आम्ही मास्क घालू, दोन गज दुरीचे पालन करू. मात्र आपल्या लक्ष्यापासून दुर होणार आहे. यामुळे लॉकडाऊन ४.० हा पूर्णपणे नव्या स्वरूपात असणार आहे. यात राज्यांकडून मिळणार्‍या सूचनांचा आधार घेतला आहे. याबाबतची माहिती १८ मे आधी दिली जाणार असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.

Protected Content