होय….राष्ट्रवादी खडसेंच्या पाठींशी खंबीरपणे उभा : ना. जयंत पाटील

चाळीसगाव प्रतिनिधी केंद्र सरकार ईडीच्या माध्यमातून विरोधकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा एकनाथराव खडसे यांच्या पाठीशी खंबरीपणे उभा असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी येथे पत्रकारांशी बोलतांना केले.

 

याबाबत वृत्त असे की, ३० आणि ३१ ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे चाळीसगाव, पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील ३८ गावांना जबर फटका बसला आहे. यात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. तर कन्नड घाटातील वाहतूक अजून देखील सुरळीत झालेली नाही. मुख्यमंत्र्यांनी तातडीने नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी आधीच नुकसानीची पाहणी केली आहे. यानंतर आज पहाटे ना. जयंत पाटील हे चाळीसगावात दाखल झाले आहेत.

 

याप्रसंगी पाहणी करण्याआधी पत्रकारांशी बोलतांना ना. जयंत पाटील म्हणाले की, ईडीच्या माध्यमातून विरोधकांना नामोहरम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ईडी या देशात विरुद्ध बाजूने सतत दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. जाचक त्रास देण्याचा प्रयत्न एऊ, उइख या केंद्राच्या एजन्सी करत आहेत हे जगजाहीर आहे. कोणाची चूक नुसताना बदनाम केलं जात आहे. हा विरोधकांना नामोहरम करण्याचा भाजपचा डाव आहे, असं सांगतानाच खडसे यांच्या पाठीशी राष्ट्रवादी पक्ष पूर्ण ताकदीनिशी उभा आहे, असं पाटील यांनी सांगितलं.

 

दरम्यान, याप्रसंगी जयंत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ओबीसी आरक्षणावर केलेल्या भाष्यावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. आमची भूमिका हीच की महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था होण्याच्या आधी ओबीसींचा प्रश्न सुटला पाहिजे. आमची बैठक झाली आहे. त्यामुळे वेगळी चर्चा करण्याची गरज नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच१२ सदस्यांच्या नियुक्तीचा राज्यपालांनी लवकर निर्णय घ्यावा. राज्यपाल लवकर निर्णय घेत नसल्याने लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

Protected Content