धरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | धरणगाव शहरात होमगार्ड व नागरी संरक्षण दलाचा ७६ व्या वर्धापन दिन ६ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर आज रविवार दि. ४ डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
होमगार्ड व नागरी संरक्षण दलाच्या ६ डिसेंबर रोजी ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त अप्पर पोलीस अधीक्षक तथा होमगार्ड जिल्हा समादेशक चंद्रकांत गवळी यांच्या आदेशानुसार व प्रशासकीय अधिकारी श्री. काळे व केंद्रप्रमुख संदीप तडवी यांच्या मार्गदर्शनानुसार धरणगाव शहरात आज रविवार दि. ४ डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक तसेच क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मारक परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यानंतर माल्यार्पण करण्यात आले. तसेच इंदिरा कन्या महाविद्यालयात परेड घेण्यात आली. शहरातील मुख्य मार्गावर पथसंचलन घेण्यात आले. त्यांच प्रमाणे होमगार्ड कर्मचारी यांना होमगार्ड व नागरी संरक्षण दलाच्या त्यांचे कर्तव्य जबाबदारीचे योगदान यांची जाणीव त्याबाबत मार्गदर्शन तालुका समादेशक अधिकारी ईश्वर एस. महाजन यांनी केले. याप्रसंगी अशोक देशमुख, भिकन लोहार यांच्यासह अनेक होमगार्ड कर्मचारी उपस्थित होते. अंशकालीन लिपिक जानकिराम पाटील यांनी आभार मानले. शहरातील नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.