जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पल्स क्रिटी केअर हॉस्पिटल येथून तरूणाचा मोबाईल आणि २५ हजारांची रोकड असा एकुण ३४ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रविवारी १८ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता अज्ञात चोरट्यांवर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, योगेश अशोक काळे (वय-३४) रा. जुने गाव, वंजारीवाडा मुक्ताईनगर जि.जळगाव हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. १७ डिसेंबर रोजी सायंकाळी ते हॉस्पिटल येथे नातेवाईकांस सोबत मुक्कामाला होते. मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिशात असलेले २५ हजार रुपयांची रोकड आणि ९ हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण ३४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी रामानंदनगर पोलीस ठाणे धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात सायंकाळी ७ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुशील चौधरी करीत आहे