सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । लॉकडाऊनमध्ये येथील हॉटेल हिना पॅलेसमधील दारू चोरीच्या बनावप्रकरणी आतापर्यंत १७ जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान काल गुरुवार ९ व आज शुक्रवार १० जुलै रोजी आणखी १० फरार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सावदा येथील हॉटेल हिना पॅलेस मधील साडेचार लाखाची चोरीची दारूची विक्री केल्याप्रकरणी आतापर्यंत हॉटेल चालकासह एकूण २७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सुरवातीस अटक झालेल्या मुख्य संशयीत कृष्णा कोष्टीसह सात जणांचा जामीन नामंजूर झाला आहे. याप्रकरणी हॉटेल चालक व मुख्य संशयीत कोष्टी याने पोलिसांना जवळपास २७ जणाची नावे सांगितली होती. यात गुरुवार व शुक्रवारी या दोन दिवसांत सावदा येथील प्रमोद वाणी, देविदास राठोड, भूषण सुरवाडकर, तुषार बेंडाळे, शेख सईद रफीफ बागवान यांच्यासह अरमान शहा कादर शहा रा. सिंगनूर, सादिक शहा सुलेमान शहा रा. सावतर निंभोरा, चेतन चौधरी रा. पिंपरुड, संजय सरोदे, रमेश जैन दोघे रा. मस्कवाद अशा दहा जणांना सावदा पोलिसांनी अटक केली आहे.