जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । परमीट बारची बंद करण्याची वेळ झाली असे सांगितल्याच्या रागातून नोकरदाराला दारू पिणाऱ्या १० जाणांनी रस्ता आडवून लाकूड, लोखंडी आसारी, दगडाने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवार ८ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अजय वाल्मिक लोहार (वय-२३) रा. स्वामी विवेकानंद नगर, जामनेर हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दिपक अनिल घन रा. जामनेर पुरा, जामनेर हा त्यांच्या मित्रांसोबत मंगळवारी ७ मार्च रोजी रात्री दारू पिण्यासाठी दारूच्या दुकानावर बसलेले होते. दरम्यान, रात्री १० वाजल्यानंतर हॉटेलमध्ये काम करणारा अजय लोहार याने हॉटेल बंद करण्याची वेळ झाली आहे. लवकर उरकवा असे सांगितले. याचा राग आल्याने दिपक घन याने अजय लोहार याला शिवीगाळ केली व तेथून निघून गेला. रात्री १०.३० वाजेच्या सुमारास अजय लोहार हा दुकान बंद करून घरी जात असतांना मराठी शाळेजवळ दिपक अनिल घन हा त्याचे मित्र गोकूळ राजू नेमाडे, सचिन संतोष बोरसे, आनंदा गोकूळ सोनवणे, भुषण लक्ष्मण धनगर, शुभम समाधान घन, भुषण अरूण बुंदेले, योगेश भरत चौधरी, हर्षल शिंदे, आकाश धनगर सर्व रा. जामनेर पुरा, जामनेर यांनी हातात लाकडी दांडो, लोखंडी सळई, दगडाने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. या घटनेप्रकरणी बुधवार ८ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता अजय लोहार याने दिलेल्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जयेंद्र पगारे करीत आहे.