जामनेरातून महिलेच्या दोन बकऱ्यांची चोरी

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर शहरातील सानेगुरूजी कॉलनीतून महिलेच्या दोन बकऱ्या चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवारी ८ मार्च रोजी रात्री ११ वाजता जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जामनेर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, छाया राजेश इंगळे (वय-३६) रा. सानेगुरूजी कॉलनी, जामनेर या महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. घरकामसह त्या बकरी पालन करण्याचा व्यवसाय देखील करतात. बुधवार ८ मार्च रोजी मध्यरात्री त्यांच्या घराच्या समोर त्यांच्या मालकीच्या दोन बकऱ्या बांधलेल्या असतांना चोरून नेले. हा प्रकार घडल्यानंतर त्यांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केला. त्यांच्याच परिसरात राहणारा गोपाल वामन चव्हाण आणि इतर अनोळखी २ ते ३ जणांनी दोन बकऱ्या चोरून त्याच्या बाजारात विक्री करत असल्याचे दिसून आले. महिलेने जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून बुधवार ८ मार्च रोजी रात्री ११ वाजता संशयित आरोपी गोपाल वामन चव्हाण आणि इतर अनोळखी २ ते ३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक मुकेश आमोदकर करीत आहे.

Protected Content