हॉटेलच्या काऊंटरमधून पैशांची चोरी करणाऱ्यावर गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील सिल्व्हर पॅलेज हॉटेलमधील लॉजिंग विभागाच्या काऊंटरमधून २ हजार १० रुपयांची रोकड लांबविल्याची घटना घडली होती. याबाबत शहर पोलीस ठाण्यात तरूणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसात दाखल तक्रारीनुसार असे की, हॉटेल सिल्व्हर पॅलेसच्या लॉजिंक विभागातील काऊंटरमधून ३१ जुलै रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास हॉटेलमधीलच भुषण फकीरा सुर्यवंशी याने मालकाच्या संमतीशिवाय २ हजार १० रुपये चोरुन नेले. चोरीची खात्री झाल्यानंतर याप्रकरणी हॉटेलचे सुपरवायझर सागर रत्नाकर झांबरे यांनी शहर पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन रविवारी ७ ऑगस्ट रोजी दुपारी भुषण फकीरा सुर्यवंशी रा. शेंदुर्णी ता. जामनेर याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय निकुंभ हे करीत आहेत.

 

Protected Content