Home राजकीय हेच दुसरं कुणी केलं असतं, तर हिंदूद्रोही ठरवलं असतं ; संजय निरुपम...

हेच दुसरं कुणी केलं असतं, तर हिंदूद्रोही ठरवलं असतं ; संजय निरुपम यांचा मोदींना टोला

sanjay nirupam

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । “बरं झालं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुंभमेळा समाप्त करण्याचं आवाहन केलं. दुसरं कुणी केलं असतं, तर त्याला हिंदूद्रोही ठरवलं असतं.” असं म्हणत ‘कुंभमेळा समाप्त करा असं आवाहन निरुमप यांनी स्वामी अवधेशानंद गिरी यांना केलं आहे.

 

कालपर्यंत ४९ लाख लोकांनी स्नान केलं कोलकातापर्यंत जाणारी गंगा कोरोना कुठपर्यंत घेऊन जाईल, माहिती नाही, असेही ते म्हणाले

 

दुसऱ्या लाटेमुळे देशात भयावह परिस्थिती आहे. संक्रमणाचा वेग प्रचंड वाढला आहे  कुंभमेळ्यावरून चिंता व्यक्त केली जात आहे. कुंभमेळ्यामुळे मोठा उद्रेक होण्याची भीती असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुंभमेळा समाप्त करण्याचं आवाहन केलं. मोदींनी आवाहन केल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यानं समाधान व्यक्त करत टोला लगावला आहे. काही आखाड्यांनी कुंभमेळ्यातून परतीची घोषणाही केली  आहे.

 


Protected Content

Play sound