जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । हुंड्याचे १५ लाख रुपये आणून दिली नाही म्हणून विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत मंगळवारी २ नोव्हेंबर रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील पोलीस मुख्यालय परिसरातील माहेर आलेल्या जयश्री प्रदीप मोरे (वय-३०) यांचा विवाह बुलढाणा जिल्ह्यातील खांडवा येथील प्रदीप मनोहर मोरे यांच्याशी रीतीरीवाजानुसार २०१३ मध्ये झाला. लग्नाचे सुरुवातीचे काही दिवस चांगले गेल्यानंतर त्यांना लहान सहान गोष्टींवरून किरकोळ कारणावरून टोमणे मारणे सुरू झाले. दरम्यान पतीने माहेरहून १५ लाख रुपये हुंड्याचे आणून द्यावे, अशी मागणी केली. परंतु विवाहितेने मागणी पूर्ण न केल्याने तिला शिवीगाळ करून चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच दमदाटी देखील केली शिवाय सासु, सासरे, नणंद, मामसासरे यांनी देखील पैशांसाठी तगादा लावला. सासरच्या मंडळींच्या छळाला कंटाळून विवाहिता या जळगावी माहेरी निघून आल्या. त्यानंतर मंगळवारी १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती प्रदीप मनोहर मोरे, सासू नर्मदाबाई मनोहर मोरे, सासरे मनोहर मन्साराम मोरे तिघे रा. खांडवा ता. मोताळा जि. बुलढाणा, ननंद ज्योतीबाई मारुत सुरवाडे रा. पुणे आणि मामसासरे पुना शेजुळे रा. हरीविठ्ठल नगर, जळगाव यांच्या विरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस नाईक पल्लवी मोरे करीत आहे.