हिवाळ्यात कोरोना प्रकोप वाढीची शक्यता कमी

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । भारतात एकूण सहा ऋतू असून हिवाळ्यात इन्फ्लुएंझाचा प्रकोप वाढताना दिसत नाही , तो जून ते सप्टेंबर या काळात वाढतो, असे विशेषज्ञ सांगतात. हे पाहता येणाऱ्या काळात कोविड-१९ चा प्रकोप वाढेल याची शक्यता फारच कमी दिसते.

पश्चिमेकडील देशांमध्ये थंडीमुळे लोक घरांमध्येच अधिक काळ थांबतात. हे पाहता एकाच ठिकाणी अधिक काळ राहणाऱ्या लोकांमध्ये विषाणूच्या प्रसाराचा धोका अधिक वाढतो.

विषाणूशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, भारताच्या बाबतीत विचार करता अशी शक्यता दिसत नाही. भारतात हिवाळ्यात देखील लोक घराबाहेर पडतात आणि भारतीय घरांमध्ये नेहमीच खेळती हवा असते सन २००९ पासूनच स्वाइन फ्लूचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये मान्सून आणि हिवाळ्यात विषाणू संसर्गात काहिशी वृद्धी झालेली आढळते. मात्र, भारतात देखील पावसाळ्याशी तुलना करता विषाणूंची वाढ हिवाळ्यात मात्र अर्धीच होते.

हिवाळा ऋतूत करोना विषाणू कोणता रंग दाखवणार?, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. कडाक्याच्या थंडीत कोरोनाचा विषाणू मरून जाईल याची अजिबात शक्यता नाही, मात्र थंड तापमानाचा विषाणूवर काय परिणाम होतो याबाबत जगभरात विशेषज्ञ आपले विचार मांडू लागले आहेत, असे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे.

हंगामी विषाणू हिवाळ्याम्ध्ये सक्रिय होतात. जगभरातील अनेक भागांमध्ये हिवाळ्यामध्ये इन्फ्युएंझाचा प्रकोप वाढताना दिसतो. भारतात आणि समान जलवायू असलेल्या क्षेत्रांमध्ये मान्सून गेल्यानंतर हिवाळ्याची चाहूल लागते. मात्र, आतापर्यंत कोविड-१९च्या कलामध्ये विशेष फरक झालेला दिसत नाही.

विषाणूंमुळे होणारे श्वसनयंत्रणेशी संबंधित आजार थंड तापमानात वाढतात. हा कल संपूर्ण जगात पाहायला मिळतो. याच कारणामुळे फ्लू विषाणूमुळे सर्वाधिक मृत्यू हिवाळ्यात होत असतात.

Protected Content