Home Uncategorized हिरापूर येथे कापड दुकानाला आग; लाखोंचा माल खाक

हिरापूर येथे कापड दुकानाला आग; लाखोंचा माल खाक

0
34

 

चाळीसगाव: प्रतिनिधी । तालुक्यातील हिरापूर येथे कापड दुकानाला शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याने दुकानातील अंदाजे  ६० लाखांचा माल जळून खाक झाल्याची घटना दुपारी  घडली .

 

 

हिरापूर येथील महेंद्र इंदरचंद जैन हे दुपारी जेवणासाठी घरी गेले होते. त्यांनी दुकानात भावाच्या मुलाला बसवले होते. दुकानात टेलिव्हिजन सुरू असताना अचानक शॉर्टसर्कीट झाल्याने आगीत दुकानातील ६० लाखांचा माल जळून खाक झाला असे सांगण्यात आले  आहे.

 

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांसह पंचायत समितीचे सभापती अजय पाटील यांनी धाव घेऊन पाहणी केली.  त्यांनी घटनास्थळावरून नायब तहसिलदार विशाल सोनवणे यांना फोनद्वारे पंचनामा करण्याचे सांगितले. त्यांच्यासह इतर स्थानिकांनी घटनास्थळी मदत केली  दिले.

 

यावेळी सभापती अजय पाटील, सरपंच रंजना वराडे , वाल्मीक पाटील, दिपक देवरे, कैलास पाटील, संदिप शिंदे, गुडू मोरे, शरद शिंदे, हबीब पठाण, आप्पा पैलवान, उद्देश शिंदे, राकेश शिंदे, सता निकुम, गणेश मराठे  मदतीच्या कामात सहभागी झाले होते .

 


Protected Content

Play sound