हिमालय देवता, लक्ष्मी-नारायण, नारदांच्या साक्षीने शिव-पार्वती सोहळ्यात रंगत

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गणेशवाडी येथे सुरु असलेल्या श्री महाशिवपुराण कथेमध्ये भगवान महादेव आणि पार्वती यांचा विवाह सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमात भगवान नारायण, लक्ष्मीदेवी, नंदी, हिमालय देवता यांसह विविध सजीव देखाव्यांनि भाविकांमध्ये उत्साह आणला. प्रसंगी भाविकांनी हर हर महादेवाचा गजर केला. विविध भजनांवर भाविकांनी ताल धरला.

शहरातील गणेशवाडी भागामध्ये श्री दत्त मंदिर परिसरात महानगर पालिकेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती तथा नगरसेविका मंगला संजय चौधरी यांच्यातर्फे संगीतमय भव्यदिव्य श्री शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. कथेच्या चौथ्या दिवशी हभप देवदत्त महाराज यांनी कथा सुश्राव्य केली.

हभप देवदत्त महाराज यांनी भगवान शंकरांच्या विविध लीलांविषयी माहिती दिली. कथेत भगवान महादेवांच्या विवाह सोहळ्याचा सजीव देखावा दाखविण्यात आला. यात भगवान शंकरांची वेशभूषा रोहित चौधरी, पार्वतीदेवीची वेशभूषा वैष्णवी चौधरी यांनी तर नंदीची भूमिका मनोज चौधरी यांनी केले. याशिवाय नारद- भगवान वानखेडे, देवी लक्ष्मी-अश्विनी चौधरी, भगवान नारायण-चेतन चौधरी, हिमालय देवता-विजय चौधरी, हिमालय देवी – जयश्री चौधरी यांनीही भाविकांचे लक्ष वेधून घेतले. तसेच वासुदेवाची भूमिका राजेंद्र पाटील यांनी केली.वेशभूषा देवेंद्र बोरसे यांनी केल्या. वेशभूषेसाठी ४ तास लागले.

कथेनंतर भगवान शंकरांची महाआरती करण्यात आली. महाआरती नगरसेवक धीरज सोनवणे, लक्ष्मीकांत चौधरी, हितेंद्र चौधरी, अमित लढढा, माजी नगरसेवक देवेंद्र धांडे यांच्या हस्ते करण्यात आली. मंगळवारी १७ रोजी श्री महाशिवपुराण कथेमध्ये श्री गणपती, कार्तिक यांच्या जन्माच्या कथा सांगितल्या जाणार आहे.

 

Protected Content