मुंबई (वृत्तसंस्था) हिंमत असेल तर पुन्हा विधानसभा निवडणुका घ्या’ अशा शब्दात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला डिवचले होते. त्यावर फक्त राज्याची विधानसभा निवडणूक कशाला घेता? पूर्ण देशाचीच घ्या, असे प्रतिआव्हान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहे.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत पवारांनी भीमा कोरेगाव, एल्गार परिषद अशा अनेक विषयांवर भाष्य केले आहे. ‘हिंमत असेल तर, आमचे सरकार पाडून दाखवा’ असे खुले आव्हान देणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिआव्हान दिले होते. सरकार पाडण्याची आम्हाला गरज नाही. ते तसेही पडेल. पण हिंमत असेल तर पुन्हा जनादेशाला सामोरे जावून दाखवा. निवडणुका घ्या’, असे फडणवीस म्हणाले होते. त्यावर ‘फक्त महाराष्ट्र या एका राज्याचीच विधानसभा निवडणूक पुन्हा कशाला घेता? संपूर्ण देशाचीच लोकसभा निवडणूक घ्या’ असे प्रतिआव्हान शरद पवारांनी दिले आहे.