हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय देसाई उद्या जळगावात !

जळगाव प्रतिनिधी । छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आदर्श हिंदुत्वाचे कार्य करणाऱ्या हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष हिंदूतेजसूर्य धनंजय देसाई हे उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर असून उद्या गुरूवार 21 जानेवारीला जळगाव येथे आगमन होत आहे.

शहरातील केमिस्ट भवनात गुरूवारी सायंकाळी ५ वाजता उपस्थित राहणार असून धनंजय देसाई हे युवकांशी संपर्क साधणार आहे. तेथे आदर्श व्यक्तिमत्त्व, व्यसनमुक्ती तसेच भारतीय संस्कृतीचे श्रेष्ठत्व आदी विषयांवर ते यावेळी मनोगत व्यक्त करणार आहेत.

जळगाव जिल्ह्यातील धर्मप्रेमी युवकांना बऱ्याच वर्षांनी धनंजय भाई देसाई यांचे विचार ऐकण्याची अमूल्य संधी यानिमित्त मिळणार आहे, तरी जिल्ह्यातील सर्व धर्मप्रेमी नागरिक, युवा वर्ग यांनी केमिस्ट भवन येथे उद्या 21 जानेवारी सायंकाळी 5 वाजता उपस्थित राहावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक मोहन तिवारी यांनी केले आहे.

Protected Content