Home Cities जळगाव हिंदू युवकाच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा द्या – हिंदूराष्ट्र सेनेची मागणी (व्हिडिओ)

हिंदू युवकाच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा द्या – हिंदूराष्ट्र सेनेची मागणी (व्हिडिओ)

0
26

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | उदयपुर येथील हिंदु युवकाच्या मारेकऱ्यांचा खटला जलद गती न्यायालयात चालवून कठोरातील कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी हिंदुराष्ट्र सेनेतर्फे उत्तर महाराष्ट्र प्रमुख मोहन तिवारी यांच्या नेतृत्वाखाली टाॅवर चौकात आंदोलनाद्वारे करण्यात आली.

 

हिंदुराष्ट्र सेनेतर्फे राजस्थानधील उदयपुर येथे दि. २८ जून रोज कन्हैया तेली या हिंदु व्यक्तीची हत्या करणाऱ्या रियाज अख्तारी व घाऊस मोहम्मद या मारेकऱ्यांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मारेकऱ्यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. मारेकऱ्यांनी धार्मिक द्वेषातुन अमानुष हत्या करुन त्याचा व्हिडीओ बनवुन, हिंदु धर्मियांना धमकविण्यात आले आहे. तसेच पंतप्रधानांची सुध्दा अशीच हत्या करु असे जिहादींनी व्हिडीओ बनवुन सोशल मिडीयाच्या माध्यमातुन दहशत पसरविण्याचे दुष्कृत्य केले आहे. या घटनेमागे मोठे देशविघातक षडयंत्र असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. भारतात अशी हिंसक मानसिकतेला खतपाणी घालणाऱ्यावर ही कठोर कारवाई करण्यात यावी. या निवेदनावर त्वरित आणि यथोचित कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. आंदोलनात हिंदू राष्ट्र सेना उत्तर महाराष्ट्र प्रमुख मोहन तिवारी यांनी कन्हैया तेलीच्या मारेकऱ्यांचा खटला जलद गती न्यायालयात चालवून कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे.

 

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/4658629857571120

 


Protected Content

Play sound