मुक्ताईनगर, प्रतिनिधी | हिंदुसूर्य महाराणा प्रताप यांच्या पुण्यतिथीनिमित्त रविवारी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या शिवनेरी या निवासस्थानी शिवसेनेच्या वतीने महाराणा प्रताप यांच्या ४७२ व्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेस माल्यार्पण करून पूजन करण्यात आले .
हिंदुसुर्य महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस अभिवादन प्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील , तालुका प्रमुख छोटू भोई, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, अल्पसंख्याक जिल्हा संघटक अफसर खान यांची उपस्थिती होती. तसेच जिल्हा नियोजन समिती सदस्य ऍड मनोहर खैरनार, माजी उपजिल्हा प्रमुख गोपाळ सोनवणे, करणी सेना जिल्हाप्रमुख गणेशसिंग ठाकूर, उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील , शहर संघटक वसंत भलभले, शहर प्रमुख गणेश टोंगे , दीपक पवार , विक्रमसिंग राजपूत ,शुभम शर्मा , ज्ञानेश्वर पाटील , शुभम तळेले यांच्यासह असंख्य शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.