Home धर्म-समाज हिंदवी स्वराज्य संघटनेच्या युवक प्रदेशाध्यक्षपदी कमलेश सोनवणे यांची निवड

हिंदवी स्वराज्य संघटनेच्या युवक प्रदेशाध्यक्षपदी कमलेश सोनवणे यांची निवड

0
31


पाचोरा, प्रतिनिधी । पाचोरा येथील  कमलेश सोनवणे यांची हिंदवी स्वराज्य संघटनेच्या युवक प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 

 

सुरगाणा संस्थानचे प्रमुख रोहितराजे देशमुख पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी काम करणाऱ्या हिंदवी स्वराज्य संघटनेच्या युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यकारणीची घोषणा नुकतीच जाहीर झाली आहे. यात युवकांचे प्रदेशाध्यक्षपदी पाचोरा येथील कमलेश सोनवणे यांची एकमताने निवड करण्यात आली. कमलेश सोनवणे यांचे सामाजिक क्षेत्रातील कार्य व महाराष्ट्रभर विविध क्षेत्रातील तळागाळापर्यंत असणारा जनसंपर्क लक्षात घेऊन संस्थापक भूषण देवरे आणि कोअर कमिटीने कमलेश सोनवणे यांची नियुक्ती केली आहे. कमलेश सोनवणे यांच्या नियुक्ती बद्दल त्यांचे सर्व स्तरावरुन अभिनंदन केले जात आहे.

 


Protected Content

Play sound