बोगस प्रमाणपत्रांचे प्रकरण दडपण्यासाठी ‘त्या’ दोघांची धावपळ !

रावेर प्रतिनिधी | बोगस अपंग प्रमाणपत्रांच्या प्रकरणात आपल्याला वाचवावे म्हणून तालुक्यातील दोन ग्रामसेवकांनी एक लोकप्रतिनिधी व जिल्हा परिषदेच्या अधिकार्‍याला साकडे घातल्याची माहिती समोर आली आहे.

काही ग्राम सेवकांनी बोगस अपंग प्रमाणपत्र काढून त्याचा लाभ घेतल्याचा विषय तालुकाभर चर्चेचा विषय असतांना आता नविन माहिती समोर आली आहे. हे सर्व प्रकरण दडपण्यासाठी यातील दोन ग्रामसेवकांनी तालुक्यातील एका लोकप्रतिनिधी व जिल्हा परिषदच्या एका अधिकार्‍याकडे यातुन वाचण्यासाठी धावाधाव करती भेट घेतल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.

गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी आठ ग्राम सेवकांना अपंग प्रमाणपत्र सादर करण्यासाठी दहा दिवसाचा अल्टीमेटम दिली असतांना आता यातील दोन ग्राम सेवकांकडून संपूर्ण प्रकरणच दडपण्यासाठी व यात सेटलमेंट करण्यासाठी पुढाकार घेतला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. यासाठी त्यांनी तालुक्यातील एका लोकप्रतिनिधी व जिल्हा परीषदच्या एका अधिकार्‍याची भेट घेतली आहे. त्यामुळे अपंग नसतांना प्रमाणपत्र काढून त्याचा लाभ शासकीय सेवेत घेऊन शासनाची फसवणुक करणार्‍यांवर कारवाई होणार की ग्रामसेवकांचे चव्हाट्यावर आलेले बोगस प्रमाणपत्र प्रकरण पळवाट काढून दडपले जाणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Protected Content