यावल, प्रतिनीधी | तालुक्यातील हिंगोणा येथील पद्मपाणी प्रोडक्शनच्या र्निमितीद्वारे आकाश तायडे यांच्यासह मित्रांनी बनवलेल्या थोट्स ह्या सायलेंट शॉर्ट चित्रपटाला ८ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याबाबत त्यांचे कौतुक होत आहे.
तालुक्यातील हिंगोणा येथील आकाश तायडे, संगीत भालेराव आणि कुणाल महाजन यांनी बनवलेल्या थोट्स ह्या सायलेंट शॉर्ट चित्रपटाला ८ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याबाबत सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. यात प्रामुख्याने शॉर्ट इंटरनेशनल फिल्म फेस्टीवलचा बेस्ट सायलेंट फिल्म, आयसीएमएफएफ चा बेस्ट सायलेंट फिल्म, आयएससीए चा बेस्ट सायलेंट फिल्म, चलचित्र रोलिंग अवॉर्ड चा बेस्ट केरॅक्टर, इंडियन फिल्मेकर फिल्म फेस्टीवल चा बेस्ट फिक्शन फिल्म, सिने फेअर फिल्म फेस्टिवल चा बेस्ट शॉर्ट फिल्म ऑफ द इयर, इंडियन शॉर्ट सिनेमा फिल्म फेस्टीवल चा बेस्ट डायरेक्टर आणि वॉलेट फिल्म फेस्टीवल चा बेस्ट सायलेंट शॉर्ट फिल्म ई पुरस्कारांचा यात समावेश आहेत.
एकपात्री असलेली ही शॉर्ट चित्रपट आपले सकारात्मक आणि नकारात्मक विचारांवर आधारित आहे. चित्रपट बनवितांना आकाश तायडे हे निर्माता, कुणाल महाजन डीओपी तर संगीत भालेराव यांची ही संकल्पना होती. यावल तालुक्यातील हिंगोणा सारख्या ग्रामीण क्षेत्रातील एका छोट्याश्या गावातुन जन्माला आलेल्या या प्रतिभावन तरूणांचा अशा कलाकृतीच्या कामगीरीचा परिसरात व तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.